29.4 C
Pune
Friday, October 30, 2026

दहावी, बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; या तारखेला होणार परीक्षा

मुंबई :
फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व अन्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामात घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३ दरम्यान तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) २ मार्च  ते २५ मार्च २०२३ दरम्यान घेण्यात येणार आहे. तसेच सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर १९ सप्टेंबर २०२२ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा किंवा उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व अन्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.

About The Author

Recent Articles

spot_img

Related Stories

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay on op - Ge the daily news in your inbox

error: Content is protected !!