भारतात दर एक हजार लोकसंख्येत एक व्यक्ती कर्करोगग्रस्त आहे. कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे.आज ‘जागतिक कर्करोग दिवस’.
कर्करोग (Cancer) हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ.
शरीरातील पेशींची संख्या नेहमी वाढत असते, पण त्यावर नियंत्रण असते. त्यामुळे त्या वाढीचे दुष्परिणाम होत नाहीत. कर्करोगात पेशींची अनियंत्रित अशी वाढ होते व या पेशी रक्तवाहिनीतून इतर इंद्रियापर्यंत पोहोचून तेथे रुजतात व वाढायला लागतात.
कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत.
किरणोत्सर्गी पदार्थांशी संबंध येणे, एखाद्या जागी सतत घर्षण होणे,काही रासायनिक पदार्थाशी संबंध येणे, काही विषाणूंचा संसर्ग होणे, अनुवंशिकता व व्यसने ही कर्करोगाची प्रमुख कारणे होत.
कर्करोगाची लक्षणे
शरीरात कोठेही अचानक गाठ येणे वा न बरा होणारा व्रण तयार होणे, स्तनामध्ये गाठ वा व्रण होणे, वजन अचानक खूप कमी होणे, भूक न लागणे, आवाज बदलणे वा बसणे, तसेच लघवी, शौचमार्ग व नाक, तोंड, कान यांतून अचानक रक्तस्त्राव होणे इत्यादीं कर्करोगाची लक्षणे दिसून येतात.
अशाप्रकारे कर्करोगाला ठेवा दूर
1. तंबाखूचं सेवन –
तंबाखू किंवा धूम्रपानामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होतो. सिगारेट ओढण्याने घशाचा, तोंडाचा व श्वासनलिकेच्या आरंभाचा, मूत्राशय व स्वादुपिंडाच्या (Pancreas) कर्करोग होतो. पाईप (चिलीम) किंवा सिगार ओढणाऱ्यांना याचा अधिक धोका असतो.
इतकंच नाही तर जे सिगारेट ओढत नाहीत, पण सिगारेट ओढणाऱ्याच्या संपर्कात राहतात (Passive Smoker), अशांना केवळ सिगारेटच्या धुरामुळे कर्करोग होऊ शकतो. सिगारेटमधील टारमुळे 30% प्रमाणात कर्करोग होतो. त्यामुळे कर्करोगापासून दूर रहायचं असेल तर तंबाखू खाणं, सिगारेट ओढणं या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
2. मद्यपान –
अतिप्रमाणात मद्यपानामुळे यकृताचा कर्करोग तर होतो. तसंच तोंडाचा, घशाचा (अन्ननलिकेचा) ही कर्करोग होतो. दारू पिणारे बहुतांश जणांना सिगारेट किंवा तंबाखूचं व्यसन असतं. मात्र या दोन्ही सवयी घातक आहेत.मद्यपान व धूम्रपान हे एकमेकांना पूरक असल्याने असे पदार्थ टाळण्यानेच कर्करोगाला आळा घालणे शक्य आहे.
3. मसालेदार पदार्थांचे सेवन –
मसालेदार पदार्थ, गरम पदार्थ यांच्यामुळेही कर्करोगाला आमंत्रण मिळू शकतं. मसालेदार व गरम पदार्थांचे अति प्रमाणात सेवन केल्याने फुफ्फुसे, तोंड, अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो सात्विक, साध्या पद्धतीच्या जेवणाचा आहारात समावेश करावा.
4.निरोगी आहार घ्या –
फळे, भाज्या आणि वनस्पती स्त्रोतांकडून अधिक प्रथिने घ्या. किमान प्राणी प्रथिने घ्या. कमी चरबी असलेले गोठलेले आणि पॅक केलेले अन्न टाळा. साखर-मीठ कमी घ्या. ओव्हनचे अन्न किमान घ्या. प्रक्रिया केलेले मांस मर्यादित करा अल्कोहोल मर्यादित प्रमाणात घ्या किंवा पूर्णपणे सोडा. अल्कोहोलमुळे स्तन, कोलन, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि यकृत यांच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
5.उन्हापासून स्वतःचे रक्षण करा –
त्वचेचा कर्करोग (cancer) हा कर्करोगाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे आणि सर्वात टाळता येण्याजोगा आहे. यासाठी दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळा. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत उन्हापासून दूर राहा. जेव्हा सूर्याची किरणे सर्वात जास्त असतात तेव्हा शक्यतो बाहेर पडू नका. बाहेर असताना शक्यतो सावलीत रहा. सनग्लासेस आणि रुंद ब्रिम्ड टोपी देखील मदत करतात. आपली त्वचा (Skin) झाकून ठेवा. शक्य तितकी त्वचा झाकणारे कपडे घाला.
6.लसीकरण करा –
काही विषाणूजन्य संसर्गामुळे होणारा कर्करोग प्रतिबंधात मदत करू शकतो. यासाठी लसीकरण करा. हिपॅटायटीस बी (Hepitatis -B) यकृताचा (Liver) कर्करोग होण्याचा धोका वाढवू शकतो. तसेच एचपीव्ही (HPV) हा एक लैंगिक संक्रमित विषाणू आहे ज्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि इतर जननेंद्रियाचे कर्करोग तसेच डोके आणि मानेचा स्क्वॅमस सेल (Squamous Cell) कर्करोग होऊ शकतो.

भावना थोरात (लेखिका या शिवसेनेच्या महिला विधानसभा संघटिका तथा शिव आरोग्य सेनेच्या राज्य प्रशिक्षक व संघटक आहेत )
7.तपासणी करा –
नियमित स्व-तपासणी करणे आणि कॅन्सरची तपासणी करणे – जसे की त्वचा, कोलन, गर्भाशय ग्रीवा आणि स्तन कर्करोग लवकर पकडण्याची शक्यता वाढवू शकते. तरच उपचार यशस्वी होण्याची शक्यता आहे. तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्याला तुमच्यासाठी सर्वोत्तम कॅन्सर स्क्रीनिंग वेळापत्रकाबद्दल विचारा.
8.नियमित व्यायाम करा –
व्यायाम करणे हे अनेक रोगांवरील रामबाण उपाय आहे. त्यामुळे नियमित व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बऱ्याच वेळा आपण मेदयुक्त पदार्थांचं सेवन करत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होत असतो. त्यामुळे अशा व्यक्तींना कर्करोगाचा धोका असतो. म्हणून नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे
कर्करोग टाळण्यासाठी वरील टिप्स आम्ही तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, जेणेकरून तुम्ही कर्करोगावर मात करू शकाल आणि तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांना यापासून सुरक्षित ठेवू शकाल.





