जुन्या कविता जुनीच पाने…
वहीत माझ्या तुझेच राहणे …
आरशात सुद्धा मी त्याच्या नजरेने पाहिले ….
असेच मी पहिले प्रेम केले …
कसे करायचे नाही सुचले …
पण मनामध्ये होते त्यालाच जपले …
त्याच्यात काय पहावे हे नाही कळले …
प्रत्येक गोष्टीत त्याच्या मन गुंतून राहिले….
असेच मी पहिले प्रेम केले ….
रितीप्रमाणे पहिले प्रेम अधुरेच राहिले …
जीवनाच्या चौकटीत मी आता एकटी उरले …
आठवणीत त्याच्या जरी कविता करायला शिकले…
पण प्रेम नावाच्या परीक्षेत नापास मी झाले ….
असेच मी पहिले प्रेम केले…
💞💞💞💞💞💞





