26.8 C
Pune
Saturday, October 31, 2026

राज्याच्या पालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर: अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडची जबाबदारी

मुंबई : राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्यांची जबाबदारी

राज्य सरकारने अखेर बहुप्रतिक्षित पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना बसला असून, त्यांचा पालकमंत्रिपदाचा पत्ता कट करण्यात आला आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, पुणे जिल्ह्याचेही पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती सरकारमधील खातेवाटपाच्या वादानंतर पालकमंत्री पदांसाठी चुरस निर्माण झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वादावर तोडगा काढत पालकमंत्र्यांची यादी अंतिम केली आहे.

महत्त्वाचे जिल्हे आणि पालकमंत्री:

गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सिंधुदुर्ग- नितेश राणे
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
सातारा -शंभुराजे देसाई
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
जळगाव – गुलाबराव पाटील
यवतमाळ – संजय राठोड
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
अकोला – आकाश फुंडकर
भंडारा – संजय सावकारे
> बुलढाणा – मंकरंद जाधव
> चंद्रपूर – अशोक ऊईके
> धाराशीव – प्रताप सरनाईक
> धुळे – जयकुमार रावल
> गोंदिया – बाबासाहेब पाटील
> हिंगोली – नरहरी झिरवळ
> लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
> मुंबई शहर – एकनाथ शिंदे
> नांदेड – अतुल सावे
> नंदुरबार – मानिकराव कोकाटे
> नाशिक – गिरीश महाजन
> पालघर – गणेश नाईक
> परभणी – मेघना बोर्डीकर
> रायगड – अदिती तटकरे
> सिंधुदुर्ग- नितेश राणे
> रत्नागिरी – उदय सामंत
> सोलापूर – जयकुमार गोरे
> वर्धा – पंकज भोयर
> जालना – पंकजा मुंडे

सह पालकमंत्र्यांची नियुक्ती:

मुंबई उपनगर -आशिष शेलार पालकमंत्री
मुंबई उपनगर – सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर पालकमंत्री
कोल्हापूर – सह पालकमंत्री माधुरी मिसाळ

राजकीय घडामोडींचा परिणाम:
धनंजय मुंडे यांच्या राजकीय प्रवासाला बीडमधील घटनेचा मोठा फटका बसला आहे. अजित पवार यांच्यावर आता दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांचा भार असून, त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author

Recent Articles

spot_img

Related Stories

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay on op - Ge the daily news in your inbox

error: Content is protected !!